सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत कमवू शकता भरगोस रक्कम

जनऔषधी केंद्रे

नवी दिल्ली: सामान्य आणि गरजू लोकांना कमी किंमतीमध्ये औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान जनऔषधी केंद्र योजना सुरु करण्यात आली होती. या माध्यमातून केंद्र सरकार गरिबांना स्वस्तात औषधे उपलब्ध करुन देते. देशात जास्तीत जास्त केंद्रे उभारण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. देशात एकूण 7,836 जनऔषधी केंद्रे आहेत.

केंद्रीय रसायन आणि खतमंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील प्रागपूर येथे जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले. मार्च 2024 पर्यंत देशभरात पंतप्रधान जनऔषधी केंद्र योजनेतंर्गत 10 हजार आस्थापने उघडणार असल्याचे त्यांनी जाहीर केला.

जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी असे करा-

  • जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी रिटेल ड्रग्स सेल्सचा परवाना घ्यावा लागतो.
  • यासाठी तुम्ही https://janaushadhi.gov.in/ संकेतस्थळावरुन फॉर्म डाऊनलोड करु शकता.
  • हा फॉर्म भरुन ब्यूरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजरकडे पाठवावा लागतो.

जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने तीन वर्ग –

  • पहिल्या गटात बेरोजगार फार्मासिस्ट, सामान्य व्यक्ती, डॉक्टर आणि नोंदणीकृत मेडिकल व्यावसायिक हे केंद्र सुरु करु शकतात.
  • दुसऱ्या गटात ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, खासगी रुग्णालये, स्वयंसहाय्यता गट यांचा समावेश आहे.
  • तिसऱ्या गटात राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या संस्थांचा समावेश होतो.

जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नाचा 20 टक्के वाटा हा दुकान चालवणाऱ्याला दिला जातो. तसेच संबंधित व्यावसायिकाला प्रोत्साहनपर भत्ताही दिला जातो. यापैकी नॉर्मल इंसेटिव्हमध्ये सरकार दुकान उघडण्यासाठी आलेला खर्च परत देते. यामध्ये दीड लाखांपर्यंतचे फर्निचर आणि कॉम्प्युटर आणि फ्रीजसाठी ५० हजारापर्यंत रक्कम टप्प्याटप्याने दिली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP