fbpx

‘त्या’ गुहेत तुम्हीही करू शकता मोदिंसारखी साधना, या आहेत सुविधा

टीम महाराष्ट्र देशा : केदारनाथमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणा केलेल्या गुहेत आता तुम्हाला पण ध्यानधारणा करता येणार आहे. त्यासाठी केवळ ९९९ रुपये मोजावए लागणार आहेत. त्या गुहेत स्वच्छतागृह, वीज आणि टेलिफोनची सुविधा उपलब्ध आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणी शेवटच्या टप्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथचा दौरा केला.दरम्यान त्यांनी तेथील एका गुहेत ध्यानधारणा केली. मात्र ती गुहा नैसर्गिक नसून ध्यान आणि अध्यात्मिक शांततेसाठी तयार करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे त्या गुहेमाद्ये आता सामान्य जनतेलाही ध्यानधारणा करता येणार आहे. त्यासाठी सामान्य जनतेला ९०० रुपये मोजावे लागणार आहे.

विशेष म्हणजे, १२२५० फूट उंचीवर तयार करण्यात आलेली टी गुहा नैसर्गिक नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ विकास धामची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तयार करण्यात आली आहे. त्या गुहेमध्ये स्वच्छतागृह, वीज आणि टेलिफोनचीही सुविधा उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर, त्या गुहेतून चहा, नाष्टा, जेवण मागवण्याची सुविधा आहे.

त्या गुहेचे बुकिंग करायचे असेल तर गढवाल मंडल विकास निगमच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करता येते.