मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज सहावा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सरकारला वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. दोन्ही बाजूंमधील भांडण सुरूच असताना यात आता किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका भ्रष्टाचारावरून टीका केली आहे.
“आम्हाला धमक्या देत आहेत. हे माफिया सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रवक्ते किरीट सोमय्याला धमक्या देत आहेत. मी उद्धव ठाकरेंना निरोप देतो. उद्धव ठाकरे साहेब, आपण मला तोतरा म्हणा, बोबड्या म्हणा, टमरेल म्हणा. आपले प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना भ** म्हणावं, चु** म्हणावं. पण हिशोब तर द्यावाच लागणार. उद्धव ठाकरे साहेब, १९ बंगल्यांचा हिशोब घेतल्याशिवाय किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही”, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी ठाकरेंना केला आहे.
मुंबई, नागपूरसह अनेक शहरांत शिंदे यांच्या विरोधात निदर्शने
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक रविवारी रस्त्यावर उतरून एकनाथ शिंदे यांचा निषेध करत आहेत. मुंबईतील सामना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे. नागपूर आणि नाशिकमध्ये बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आल्या असून शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<