You Broadband कंपनी कडून होत आहे ग्राहकांची फसवणूक

You-Broadband

पुणे- सध्याचा जमाना ऑनलाइनचा असल्याचे म्हटले जाते. जगात इंटरनेट युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सगळेच व्यवहार ऑनलाइन होत आहेत. ऑनलाइनच्या युगात इंटरनेट गरजेचे झाले आहे. स्टार्टअप आणि मोठया उद्योगांची कामे इंटरनेटवर अवलंबून असतात. माहिती प्रसारणाचे प्रमुख माध्यम इंटरनेट आहे .

दरम्यान आता इंटरनेट ब्रॉडबँड कंपन्यांकडून मनमानी कारभार होत असल्याचं आता समोर आले आहे. पुण्यातील यु ब्रॉडबँड कंपनीने ग्राहकाला फसवल्याची घटना घडली आहे. 25 जुलै रोजी ग्राहकांने यु ब्रॉडबँड कंपनीचे ब्रॉडबँड घेतले होते. 3 महिन्यांचे संपूर्ण पैसे ही भरले होते मात्र कंपनी कडून ब्रॉडबँड द्यायला उशीर होत होता. ग्राहकांने वारंवार सूचना आणि रिक्वेस्ट करून इंटरनेट चालू करून घेतले. पण काही वेळातच इंटरनेट बंद पडले. यु कंपनीच्या अधिकर्यांना या बाबत माहिती देऊन ही त्यांनी याकडे कानाडोळा केला. 31 ऑगस्ट पर्यन्त तब्बल १२ ते १५ दिवस इंटरनेट बंद असल्याने ग्राहकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालं असल्याचं सांगितले.

Loading...

ग्राहक दाद मागण्यास कंपनी च्या ग्राहक सेवेत फोन केला असताना त्याला वाईट वागणूक दिली गेली असल्याचं ग्राहकाने सांगितले आहे. पूर्ण 3 महिन्याचे अगोदर पैसे भरून ही इंटरनेट मिळत नसल्याने ग्राहकाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचं ग्राहकाने सांगितले. इतर ग्राहकांनी या कम्पनी ची सेवा घेताना 100 वेळा विचार करावा असं देखील या ग्राहकाने सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार