Share

Raosaheb Danve : “तुम्ही आहात एमआयएमचे पण वाटता भाजपचे”; दानवेंचा इम्तियाज जलील यांना टोला

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील  रेल्वे पीटलाइन आणि रेल्वेस्थानकाच्या नुतीनकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील रेल्वे विकास रखडण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. याला प्रत्युत्तर देत केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या शैलीत तुफान फटकेबाजी केली.

तुमची आणि आमची दोस्ती पक्की आहे, तुम्ही आहात एमआयएमचे पण वाटतात भाजपचे, असा चिमटा त्यांनी यावेळी इम्तियाज जलील (Imtiyaj Jaleel) यांना काढला. पुढे ते म्हणाले, मराठवाड्याचा हा भाग निजामाच्या राजवटीखाली होता, निजामाला रेल्वेची गरज भासत नव्हती, म्हणूनच इथे विकास होऊ शकला नाही. त्यामुळे याला निझामच जबाबदार होता.

रेल्वेच्या मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि हा भाग दक्षिण मध्य रेल्वेतून काढून मध्य रेल्वेला जोडणे या मागण्यांची आठवण यावेळी त्यांनी करून दिली. या मागण्यांपैकी दोन मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुर्ण केल्या असल्याचं ते यावेळी म्हणाले. येत्या २०२३ पर्यंत देशातील बहुतांश रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पुर्ण होतील असं आश्वासन त्यांनी दिलं. दुहेरीकरणाचे काम देखील झपाट्याने सुरू आहे. मध्य रेल्वेत समावेश करण्याचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

इम्तियाज जलीलजी गेल्या तीन वर्षापासून रेल्वेच्या संदर्भात मागण्या लोकसभेत मांडत आहेत. त्याच मागण्या गेल्या २५ वर्षांपासून आम्ही करत असल्याचं रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. तेव्हा यापुढे इम्तियाज जलील जेव्हा तुम्ही भाषण कराल तेव्हा या गोष्टी मोदी सरकारच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्या हे सांगायला विसरू नका. मोदी सरकारच्या काळात कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी ११ हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे महसुल मिळत नाही, म्हणून औरंगाबाद किंवा मराठवाड्याचा रेल्वे विकास थांबला असे आता होणार नाही असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील  रेल्वे पीटलाइन आणि रेल्वेस्थानकाच्या नुतीनकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics