तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार आहात : धनंजय मुंडे

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘परळी मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ” परळीकरांना तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार आहात, ” असे म्हणत, एकप्रकारे आपल्या विजयाची खात्री दर्शवली आहे. राज्यभरातील विधासभा निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वत्र मतदान पार पडले असून आता उमेदवारांसह पक्षांना व मतदारांना निकालाचे वेध लागले आहेत.

काही उमेदवारांनी मात्र निकालाअगोदरच आपला विजय निश्चित झाल्याचे सांगत आहेत तर काहींनी विजयाचे निश्चित झाल्याचे बॅनरही लावले आहेत. हे पाहता मतदारांची निकालाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आपल्या ट्वीटर वर ट्वीट करत परळीकरांना एक संदेश दिला आहे. ” लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्याबद्दल माझ्या तमाम परळीकरांचे आभार! तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार आहात, याची हमी मी तुम्हाला देतो. ” असे मुंडे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

राज्यातील लक्षणीय ठरलेल्या लढतीतील परळी मतदार संघातील बहिण भावाच्या लढतीच्या निकालाकडेही राजकीय पक्षांसह राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय, प्रचार कालावधीत शेवटच्या दिवसापर्यंत घडलेल्या घडमोडींनी व सभांमधील आरोप प्रत्यारोपांनी येथील निवडणूक अधिकच रंजक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :