नवी दिल्ली: सध्या देशात बँक गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर आरबीआय ने मोहीम सुरु केली आहे यामध्ये राज्यासह देशातील अनेक खाजगी संस्था आणि बँकांच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील वाढत्या एटीएम घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने मोठे पाऊल उचललेय.
त्यामुळे पीएनबी १ फेब्रुवारी २०२१ पासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमवी एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत. म्हणजेच आपण ईएमव्ही नसलेल्या मशिनमधून पैसे काढू शकणार नाही. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिलीय.
To protect our esteemed customers from fraudulent ATM activities, PNB will be restricting transactions(financial & non-financial) from Non-EMV ATM machines from 01.02.2021. Go Digital, Stay Safe!
#TransactioKaroFearless #ATM pic.twitter.com/puvHq7fda3
— Punjab National Bank (@pnbindia) January 14, 2021
पंजाब नॅशनल बँकेने यासंदर्भात ट्विट केले आहे की, आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी पीएनबी ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशीनमधून १ फेब्रुवारीपासून व्यवहार करण्यापासून बंदी घालेल. बँकेने म्हटले आहे की, वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता पीएनबीने हे पाऊल उचललेय. जेणेकरून ग्राहकांचे पैसे सुरक्षित असतील. 1 फेब्रुवारीपासून ईएमव्हीशिवाय ग्राहक एटीएममधून आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत.
EMV नॉन एटीएम असे असतात, ज्यात व्यवहाराच्या वेळी एटीएम कार्ड मशीनमध्ये जास्त काळ ठेवावे लागत नाहीत. यात डेटा चुंबकीय पट्टीद्वारे वाचला जातो. याशिवाय EMV एटीएममध्ये व्यवहार होईपर्यंत काही सेकंदांसाठी कार्ड लॉक स्वरूपात ठेवावे लागते. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना पीएनबीने अ;ॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू/बंद करण्याची सुविधा दिली आहे. आपण आपले कार्ड न वापरल्यास आपण ते बंद करू शकता. असे केल्याने आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा सावध रहा, भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका!
- राज्यात आज २१ हजार ६१० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
- महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश मिळतेच – बाळासाहेब थोरात
- पुणे : मंडई मधील भाजीपाला,गाळेधारक ,इतर व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार-आंबेडकर
- राज्यात सुरु होणार ‘जेल टुरिझम’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारीला उद्घाटन