यॉर्कशायर काऊंटी संघाने केल चेतेश्वर पुजाराला करारबद्ध

cheteshwar pujara

टीम महाराष्ट्र देशा: टिम इंडियाचा मधल्या फळीतील कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराला इंग्लंड मधिल काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी याॅर्कशायर संघाने नुकतेच करारबद्ध केले आहे. एप्रिल २०१८ मधे होणाऱ्या काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत चेतेश्वर पुजारा याॅर्कशायर संघाचे प्रतिनिधित्व करेल.

यापूर्वीही चेतेश्वर पुजारा २०१५ साली काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत यॉर्कशायर संघाकडून खेळला होता ज्यामध्ये यॉर्कशायर संघाला काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकण्यात मोलाची कामगिरी केली होती.

यावेळी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना पुजारा म्हणाला, मी यॉर्कशायर संघाचे पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप ऊत्सुक आहे. काऊंटी क्रिकेट खेळल्याने माझ्यात एक खेळाडू म्हणून खूप प्रगती झाली आहे. मला या मोसमात जितक्या शक्य आहेत तितक्या धावा करायच्या आहेत, जेणेकरुन माझ्या फलंदाजीचा यॉर्कशायर संघाला फायदा होईल. तसेच मला माझा आत्मविश्वास ऊंचावण्यास मदत होईल. त्याचबरोबर पुढील काळात इंग्लंड मध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतासाठी चांगली कामगिरी करण्याचा सराव होईल. पुजारा  बरोबरच यॉर्कशायर संघाचे न्यूजीलैंडचा केन विलियम्स व इंग्लंडचा जो रूटही प्रतिनिधित्व करतील. या तीघांमुळे जागतिक कसोटी क्रमवारीत असलेल्या अव्वल सहा फलंदाजांपैकी तीन फलंदाज यॉर्कशायर संघाकडून २०१८ च्या काऊंटी मोसमात खेळतील.

pujara