fbpx

बॅडमिंटनमधील महावीरांच्या योनेक्स वर्ल्ड टूरचे भारतात आगमन

badminton-1428046_960_720

मुंबई :४ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईतील द नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे होत असलेल्या डोममध्ये लीन दान, ली चाँग वी, पीटर गेड, तौफीक हिदायत, ली याँग दे असे जगविख्यात खेळाडू सहभागी होणार आहेत. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू बँडमिंटनमधील भारतीय महान खेळाडू प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद यांच्याबरोबर व्यासपीठावर असतील. मुंबईत बँडमिंटनमधील अशाप्रकारचा कार्यक्रम होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
योनेक्सचा पाठिंबा असलली ही लिजंट्स व्हिजन योनेक्स वर्ल्ड टूर जागतिक स्तरावरील उपक्रम आहे आणि याची सुरुवात २०१५ सालापासून झाली आहे. जागतिक स्तरावर या खेळाबाबत जागरुकता वाढावी आणि सहभाग वाढावा या हेतूने या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून भारतीय बॅडमिंटन सुधारते आहे, लिजंड्स व्हिजन वर्ल्ड टूर एक उत्तम प्रोत्साहकठरणार आहे, यामुळे भविष्यात अनेक बॅडमिंटन खेळाडू होऊ पाहणाऱ्यांनाचालना मिळणार आहे, तसेच आपल्या आयडॉल्सना जवळून पाहण्याची आणि वैयक्तिक पातळीवर त्यांना जाणण्याचीसंधी प्राप्त होणार आहे. किदाम्बी श्रीकांथ, पी. व्ही. सिंधु आणि सायना नेहवाल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे, आणि जागतिक स्तरावर आज भारताचे स्थान अढळ झाले आहे.