धोनीसारखा कचरा एक दिवस साफ होणार ; योगीराज सिंह

टीम महाराष्ट्र देशा :  नुकतीच अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेला भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडिल योगीराज सिंह यांनी पुन्हा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. धोनीसारखा कचरा एक दिवस साफ होणार आहे. कधी ना कधी निवड समितीमध्ये चांगले लोक येतील, चांगला कर्णधार येईल. अशी टीका योगीराज सिंह यांनी केली. अंबाती रायडू यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर ते बोलत होते.

Loading...

क्रिकेटपटू अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी जाहीर केला. दरम्यान रायडू यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर युवराज सिंह यांचे वडील योगीराज सिंह यांनी भाष्य केले. दरम्यान त्यांनी महेंद्रसिंह धोनी यांच्यावर निशाणा साधला.  अंबाती रायडूने अचानकपणे निवृत्ती जाहीर केली. हे ऐकून मला धक्का बसला. रायडू हा प्रतिभावंत खेळाडू असून तो निवड समितीच्या निर्णयाचा बळी ठरला. असे योगीराज सिंह यांनी म्हंटले,

इतकेच नव्हे तर महेंद्र सिंह धोनीसारखा कचरा एक दिवस साफ होणार आहे. कधी ना कधी निवड समितीमध्ये चांगले लोक येतील, चांगला कर्णधार येईल. अशी टीकाही त्यांनी केली. याचबरोबर रायडू तू हरु नकोस निवृत्तीचा निर्णय माघारी घे आणि पुन्हा मैदानात उतर आणि चांगला खेळ करुन तुझी प्रतिभा दाखवून दे, असेही त्यांनी म्हंटले.Loading…


Loading…

Loading...