२६ ऑक्टोबरला योगी देणार ताजमहालला भेट

ताजमहाल परिसरात सोयीसुविधा पुरवणे आणि पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य:योगी

टीम महाराष्ट्र देशा : गद्दारांनी बांधलेला ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे विधान उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले होते.याच मुद्द्यावरून राजकारण रंगले असताना आता स्वतः योगी आदित्यनाथ ताजमहालाला भेट देणार आहेत त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे म्हटल्यामुळे मोठा वाद झाला होता. याबद्दल बोलताना, ताजमहाल भारतीय कामगारांच्या घामातून उभारण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. ‘पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ताजमहाल महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच ताजमहाल परिसरात सोयीसुविधा पुरवणे आणि पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे,’ असे आदित्यनाथ यांनी म्हटले. योगी आदित्यनाथ २६ ऑक्टोबरला आग्र्याला भेट देणार आहेत. त्यावेळी ते ताजमहाललाही भेट देतील.

 

You might also like
Comments
Loading...