योगी सरकारचा तुघलकी फतवा ; घातली लग्नाला बंदी

टीम महाराष्ट्र देशा : जानेवारी किंवा मार्च 2019 या महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढला असल्यास तर तो बदलावा लागणार आहे. कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता प्रयागराज येथील लग्नांवरच बंदी घातली आहे. योगी सरकारचा अजब आदेश जानेवारी पासुन लागू होणार आहे. यात जानेवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या लग्नसमारंभास परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रयागराज येथे या महिन्यात कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

तसेच त्यांनी प्रयागराज येथे जानेवारी ते मार्च महिन्यात कुणी लग्नासाठी हॉल बुक केला असेल किंवा इतरही कोणती बुकिंग केली असल्यास नागरिकांनी आपले पैसे परत घ्यावेत, असे सांगितले आहे. प्रयागराज सोडून इतर शहरात मात्र लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून यासंबंधीच्या आदेशाची प्रत हॉटेलमालक आणि लग्न समारंभासाठी हॉल देणाऱ्या मालकांना देण्यात आली आहे. सराकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या एकदिवस अगोदर आणि एक दिवस नंतर लग्न सोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

रामदेव बाबांना योगी सरकारचा दिलासा; पतंजली फूड पार्क उत्तरप्रदेशमध्येचं होणार