आम्ही विरोधकांना घाबरत नाही – योगी आदित्यनाथ

YOGI_Adityanath

इटावा : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला अपयश आलं होतं. उत्तर प्रदेशातील दोन्ही जागांवर भाजपचा दारुण पराभव झाला असून, विरोधकांनी एकजूट दाखवल्यानेच भाजपचा पराभव झाला अशी चर्चा आता होताना दिसते आहे.

दरम्यान या चर्चेला उतररप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचा कैराना आणि नूरपूर या दोन ठिकाणच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला. मात्र विरोधकांनी एकत्र येऊन आघाडी केली असली, तरीही आम्ही त्यांच्या आघाडीला घाबरत नाही, असे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले . इटावा येथील एका रॅलीला ते संबोधित करत होते.

या वेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधक हे नक्षलवादाला पाठिंबा देत आहेत. तसेच विरोधकांनी त्याच्या काळातील सरकारमध्ये भ्रष्टाचार केला आहे. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेता सर्व विरोधक हे पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात एकत्र येत आहेत. पण त्याच्या या आघाडीला आम्ही घाबरत नसल्याचं ते म्हणाले.Loading…
Loading...