fbpx

पश्चिम बंगालमध्ये वातावरण पेटले, योगी आदित्यनाथ म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहयला मिळाला. तसेच शहा यांची रॅली सुरु झाल्यानंतर ट्रकवर काठ्या भिरकावल्याने वातावरण तापले होते, यावेळी तुफान दगडफेकही करण्यात आली.

यावर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात ‘ बंगाल, श्री राम म्हणत तुम्हाला अभीवादन करतो, आज हुकुमशहांना एक संदेश द्यायचा आहे की राम या देशाच्या कणा-कणात वास्तव्य करतो आहे, स्वातंत्र्य या देशाची शक्ती आहे’. असं म्हणत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे.

तसेच ‘याचना नहीं, अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा’ अशा आशयाच ट्वीट करत योगी यांनी ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे.