पालघर पोटनिवडणूक; योगी आदित्यनाथ करणार भाजपचा प्रचार

YOGI_Adityanath

पालघर – भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघरमध्ये पोटनिवडणुका होणार असून, येत्या 28 तारखेला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मैदानात उतरणार आहेत.

दरम्यान पालघरमध्ये शिवसेना हिदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून,शिवसेनेच्या हिदुत्वाला उत्तर देण्यासाठीच भाजपने योगी आदित्यनाथ यांना पाचारण केल्याचं बोललं जातय. तसेच पालघरमध्ये ख्रिश्चन समाजाचं प्राबल्य आहे. त्याविरोधात हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठीही योगी आदित्यनाथ यांचा उपयोग होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे आदित्यनाथ हेच मुख्य प्रचारक असण्याची शक्यता आहे.