महाराष्ट्रात महापुर झाला तेव्हा राहुल गांधी इटलीला होते – योगी आदित्यनाथ

सेलू : गेल्या पाच वर्षापुर्वीची देशाची स्थिती काय होती, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात देशाचा विकास झाला. महाराष्ट्रात जेंव्हा अनेक भागात पुरवृष्टी झाली होती. त्यावेळी काॅग्रेसचे राहुल गांधी इटलीला गेले होते. असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांना लगावला.

सेलू (जि. परभणी) येथे गुरूवारी पाथरी रस्त्यावरिल बोर्डीकर मैदनावर महायुती भाजपाच्या जिंतूर-सेलू विधानसभेच्या उमेदवार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा झाली.

योगी म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली काश्मीर मधिल ३७० कलम हाटविला. त्यामुळे आतंकवाद, नक्षलवाद नियंत्रणात आला. भविष्यात देशातून आतंकवाद, नक्षलवाद समुळ नष्ट होणार असल्याचे श्री.योगी यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या