काँग्रेस निवडणूक जिंकल्यास मुस्लीम लीगचा व्हायरस देशभरात पसरेल- योगी आदित्यनाथ

YOGI_Adityanath

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक नेते एकमेकांवे टीका करताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचा निवडणूक जिंकल्यास मुस्लीम लीगचा व्हायरस देशभरात पसरेल. असं या ट्वीट मध्ये आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

मुस्लीम लीगच्या व्हायरसची लागण झालेले कोणीही वाचू शकत नाही, कारण मुस्लीम लीग हा खूपच घातक व्हायरस आहे. काँग्रेसला त्याची लागण झालेली आहे. जर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकला तर देशभरात या व्हायरसचा फैलाव होईल.१८५७ साली झालेल्या उठावाच्यावेळी संपूर्ण देश मंगल पांडे यांच्या मागे ठामपणे उभा राहिला होता. त्यानंतर देशात मुस्लीम लीगचा व्हायरस उत्पन्न झाला आहे. हा व्हायरस असा काही पसरला की देशाची फाळणी झाली.

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ट्वीट मध्ये आता पुन्हा एकदा देशासमोर असे संकट उभे ठाकले आहे. देशातील जनतेने कॉंग्रेसपासून सावधान रहा असा सल्ला त्यांनी दिला आहे.