लखनऊ: ‘द काश्मीर फाइल्स’च्या टीमने रविवारी कॅबिनेट मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी, अभिनेता अनुपम खेर, चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्यासह टीमचे इतर सदस्यही उपस्थित होते. उत्तर प्रदेशमध्ये काश्मीर फाइल्स टीमने ‘द काश्मीर फाइल्स’ करमुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. तत्पूर्वी, टीमने उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली.
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या टीमची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “हा चित्रपट धार्मिक कट्टरता आणि दहशतवादाची अमानवी भीषणता निर्भीडपणे दाखवतो. हा चित्रपट समाज आणि देशाला जागृत करण्याचे काम करेल, यात शंका नाही. अशा विचार करायला लावणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन”.
उत्तर प्रदेश सरकारने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही कर मुक्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात 100 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या राजकीय वळणामुळे चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या: