fbpx

भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का, योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर बंदी

YOGI_Adityanath

टीम महाराष्ट्र देशा: भाजपला उत्तर प्रदेशात मोठा दणका बसला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे, त्यामुळे कोणत्याही भाजप उमेदवारासाठी ते प्रचार करू शकणार नाहीत. संपूर्ण लोकसभा निवडणुकीसाठी नसून केवळ 72 तासांसाठी घालण्यात आली आहे. बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर देखील 48 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ त्यांच्याकडून प्रचारादरम्यान केल्या जाणाऱ्या धार्मिक टिकेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ 9 यांनी एप्रिल रोजी झालेल्या सभेत सपा बसपाकडे ‘अली’ तर आमच्याकडे ‘बजरंगबली’ असल्याची टीका केली होती. तर मायावती यांच्याकडून देखील धार्मिक टीका करण्यात आली होती.

दरम्यान, उद्या 16 एप्रिल सकाळी 6 वाजल्यापासून योगी आदित्यनाथ 72 तासांसाठी, तर मायावती या 48 तासांसाठी प्रचार करू शकणार नाहीत.