fbpx

समाजवादी पक्षाच्या अस्ताची वेळ आता आली आहे- योगी

yogi adityanath on namaj

टीम महाराष्ट्र देशा- ईशान्य भारतात डाव्या पक्षांच्या पराभवाचा हवाला देत त्यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. सुर्योदयावेळी सुर्याचा रंग केशरी होतो आणि सूर्यास्तावेळी लाल रंग होतो. समाजवादी पक्षाच्या टोपीचा रंगही लाल असून त्यांच्या अस्ताची वेळ आता आली आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला टोला लगावला आहे. फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार कौशलेंद्र सिंह पटेल यांच्या समर्थनात नवाबगंज येथे आयोजित एका सभेत योगी विरोधकांवर चांगलेच बरसले. ११ महिन्यात केलेल्या विकास कामांचा पाढा देखील यावेळी योगींनी वाचून दाखवला तसेच आधीच्या सप सरकारवर भेदभावाचा आरोप केला.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ

सुर्योदयावेळी सुर्याचा रंग केशरी होतो आणि सूर्यास्तावेळी लाल रंग होतो. समाजवादी पक्षाच्या टोपीचा रंगही लाल असून त्यांच्या अस्ताची वेळ आली आहे.पूर्वीच्या सप सरकारवेळी वीज राज्यातील फक्त चार जिल्ह्यांना मिळत होती. पण आम्ही राज्यात विजेचे समान वितरण धोरण आखल्याचे त्यांनी सांगितले.भाजपासरकारकडून विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. विकासात कोणताच भेदभाव नाही. मग ते गोरखपूर असो किंवा अलाहाबाद, लखनऊ आणि आग्रा, सर्वांचा समान पद्धतीने विकास केला जाईल. आम्ही अवघ्या १० महिन्यात गरिबांना ११ लाख घरे उपलब्ध करून दिले. ८६ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सुरूवात केली आहे. येत्या दोन वर्षांत पाच लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आमचे सरकार हे विकास आणि सुशासनाचे एक प्रतिरूप असेल. तुम्ही राज्यातील सप सरकारचा कार्यकाळ पाहिला आहे. त्यावेळी प्रत्येक आठवड्याला सरासरी दोन दंगली होत. दंगेखोरांना राजकीय आश्रय दिला जात. पण मागील ११ महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये एकही दंगल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

1 Comment

Click here to post a comment