पुणे महापालिकेच्या तिजोरीची चाव्या अखेर भाजपच्या योगेश मुळीक यांच्या हातात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दुधानेंचा केला पराभव

पुणे: ५ हजार ८०० कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या पुणे महापालिकेच्या तिजोरीची चाव्या अखेर भाजप नगरसेवक योगेश मुळीक यांच्या हातात गेल्या आहेत. आज स्थायी समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मुळीक यांनी राष्ट्रीवादी काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी दुधाने यांचा १० विरुद्ध ५ मतांनी पराभव केला आहे.

स्वपक्षातील दिग्गज नगरसेवकांना धक्कादेत आमदार जगदीश मुळीक यांनी आपल्या भावासाठी म्हणजे योगेश मुळीक यांच्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली होती. शनिवारी मुळीक यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. स्थायी समितीमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व असल्याने त्यांची निवड निश्चित होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्मी दुधाने यांची उमेदवारी देत भाजपला आव्हान दिले. आज अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये योगेश मुळीक यांनी दुधाने यांचा पराभव करत विजय मिळवला.