योगेश मुळीकांना पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची लॉटरी

पुणे: पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजप नगरसेवक योगेश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. आज अध्यक्षपदासाठी अर्ज भरायचे असल्याने सकाळीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमक्या कोणत्या आमदाराच्या पारड्यात माप टाकणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर दिवसभर चाललेल्या राजकीय खलबतांनंतर दुपारच्या सुमारास मुळीक यांचे नाव निश्चित करण्यात आल. योगेश मुळीक हे वडगावशेरी मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच झाल्याच दिसून आल आहे. अध्यक्षपदावर वर्णी लागावी म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ जेष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्यासह , मंजुषा नागपुरे, नीलिमा खाडे तसेच योगेश मुळीक आणि रंजना टिळेकर यांच्यात चुरस लागली होती. जेष्ठतेनुसार विचार केल्यास सुनील कांबळे यांची वर्णी निश्चित मानली जात होती. मात्र आमदार जगदीश मुळीक यांनी थेट ‘वर्षा’वरून विशेष प्रयत्न करत स्थायीचे अध्यक्षपद आपल्या घरात खेचून आणल्याच बोलल जात आहे.

Loading...

आज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे मुळीक यांचा एकमेव अर्ज सादर करण्यात आला आहे.. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मावळते स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांच्यासह अनेक नगरसेवक तसेच इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील