उस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत?

तुळजापूर– लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास थोडासा अवधी बाकी असताना सत्ताधारी भाजपा लोकसभा निवडणूक लढण्या-यांच्या यादीत खा.संभाजी राजेचे सचिव तुळजापूर तालुक्यातील रहिवासी असलेले योगेश केदार यांचे नाव पुढे येत आहे.

खा.संभाजीराजेचा चाहता वर्ग उस्मानाबाद जिल्हयात लक्षणीय आहे. शिवराज्य अभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम असो की तुळजाभवानी दर्शन वर्षभरातून चार ते पाच वेळा खा.संभाजी राजे उस्मानाबाद जिल्हयात येत असतात. यामुळे उस्मानाबाद जिल्हयात त्यांचावर मनापासून प्रेम करणारा वर्ग मोठा आहे.त्यातच त्यांनी आपला सचिव म्हणून दिल्लीत तुळजापूर तालुक्यातील शेतकरी गरीब कुंटुबात जन्मलेल्या सलगरादिवटी येथील शिक्षणासाठी गेलेल्या योगेश केदार यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे खा. संभाजीराजेचा सचिव म्हणून योगेश केदार यांचे अमित शहा सह अनेक भाजपा वरिष्ठ नेत्यांचा संपर्कात आले आहे. यातुन त्यांची ओळख निर्माण झाली .

उस्मानाबाद जिल्हयाचा विकास व्हावा म्हणून दिल्लीत रेल्वे मार्ग, पासपोर्ट कार्यालय यासाठी खा. संभाजीराजे यांच्या माध्यमातून मोठा पाठपुरावा करुन प्रयत्न केले आहेत.