आ. मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल : योगेश गोगावले

पुणे :  आमदारांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन म्हणजे ‘स्टंट’ असल्याचे वक्तव्य कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले होते.या वक्तव्याचे पडसाद आज दिवसभर उमटले आहेत. दरम्यान, आ मेधा कुलकर्णी यांच्याशी माझे अजून बोलणे झालेलं नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जाईल, नेमकं प्रकरण काय आहे याबाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू असे मत, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केलं आहे.

आमदारांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन म्हणजे ‘स्टंट’: भाजप आ. मेधा कुलकर्णींच वादग्रस्त विधान

मराठा क्रांती मोर्चाकडून आमदारांच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणे भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना भोवण्याची शक्यता दिसत आहे, आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाकडून त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार मेधा कुलकर्णींच्या वक्तव्या विरोधात मराठा संघटना आक्रमक, घरासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजप पूर्ण प्रयत्न करत आहे,आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.मराठा समाज नक्की समाधानी होईल असा आम्ही प्रयत्न करत आहोत.जर कोणी व्यक्तिगत स्वरुपात काही विधाने केली असतील तर त्याविषयी माहिती घेवून बोलणेच योग्य राहील मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे असं गोगावले यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाकडून आज सकाळी त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली तर आता आंदोलन सुरु असताना मेधा कुलकर्णी यांच्या मुलाने आंदोलकांशी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना नेमकं काय म्हटल्या होत्या मेधा कुलकर्णी?

शासन आपल्या पातळीवर आरक्षण देण्याचा योग्य प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून काय फायदा, असा प्रश्न यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित केला.  हे सर्व मुद्दे बौद्धिक पातळीवर आणि कायद्याच्या चौकटीत सोडवायला हवेत, आमच्या दारासमोर आंदोलन करून त्यांना आरक्षण मिळणार असेल तर त्यांनी ते करावं. मात्र, मराठा आंदोलक केवळ वेळ वाया घालवत स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी दिली आहे.

मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चा : पुण्यातील बाजार पेठा बंद