गुजरात: योगेंद्र यादवांचा गुजरात पोल; काँग्रेसला 92 तर भाजपला 86 जागा

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर सर्व भारताचं लक्ष लागले आहे. कारण ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. कधी नव्हे ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकांत भाजपला आपली संपूर्ण ताकद लावण्यास भाग पाडले आहे. अशातच आता स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी आपला अंदाज वर्तवला असून यामध्ये काँग्रेसला 92 तर भाजपला 86 जागा मिळणार असल्याचं भाकीत वर्तवल आहे.

योगेंद्र यादव यांनी ट्विटकरत हा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या शक्यतेनुसार काँग्रेसला एकूण मतांच्या 43 टक्के म्हणजेच 92 तर भाजपलाही 43 टक्के म्हणजेच 86 जागा मिळणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसऱ्या अंदाजानुसार काँग्रेसला 45 टक्के आणि 113 जागा तर भाजपला 41 टक्के आणि 65 जागा मिळणार असल्याचं भाकीत यादव यांनी व्यक्त केलं आहे.