fbpx

देशभरात जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन योगदिन साजरा : नरेंद्र मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी ४५ व्यांदा संवाद साधला आहे. या संवादात त्यांनी योग, खेळ, जीएसटी, आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बदद्ल चर्चा केली.

जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उल्लेख मोदी यांनी केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, जगभरातून योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. योगदिवशी दिव्यांग व्यक्तींनीही योग करीत विश्वविक्रम रचला, हे भावूक करणारे दृश्य होते. सौदी अरेबियामध्ये महिलांनीही योगासने करीत ऐतिहासिक कामगिरी केली. देशात जाती आणि धर्मातील सर्व सीमा तोडून योग केला जात आहे.

नरेंद्र मोदी यांनी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण यावेळी करुन दिली.ते म्हणाले, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. २३ जूनला श्यामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली. ते अवघ्या ३३ व्या वर्षी विद्यापीठाचे कुलगुरु बनले होते. भारतातील औद्योगिक वाढीत डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे नाव नेहमी घेतले जाईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
ठळक मुद्दे:
४५ व्यांदा ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला
जगभरातून योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण