यासाठी विझवू नका वाढदिवाच्या दिवशी केकवरील कँडल…

वेबटीम : वाढदिवसाच्या दिवशी केकवरील कँडल विझवण्याची पाश्चिमात्य संस्कृती हळूहळू संपूर्ण जगात पसरली आहे. जन्मदिन असो वा लग्नाचा वाढदिवदिवस केकवरती असंख्य कँडल लाऊन त्या विझवण्यासाठी त्या व्यक्तीला त्रास दिला जातो. पण आता असे करणे आरोग्यास हानिकारक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

साऊथ कॅरोलिनाच्या क्लेमसन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, मेणबत्या विझवताना बऱ्याचदा थुंकी केकवर पसरण्याची बरीच शक्यता असते. त्यामुळे 1400% जीवाणू त्या केकवर बसण्याची शक्यता असते. हा रिसर्च करणारे डॉ डाव्हसन आणि त्याच्या टीम ही माहिती समोर आल्यानं आश्चर्यचकीत झाले. याबाबत रिसर्च करत असताना त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली. यामुळे डॉ, डाव्हसन यांच्या मते, यापुढे केकवर मेणबत्या लावणंच बंद करायला हवं.
पण अनेक वैज्ञानिकांच्या मते, ‘मनुष्याचा तोंडात अनेक जीवाणू असतात. पण त्यातील सगळ्याच घातक नसतात. त्यामुळे ही समस्या फार गंभीर असल्यास यावर नक्कीच विचार केला गेला असता.’ डॉ. डाव्हसन यांच्या मते, जर कोणी आजारी व्यक्ती मेणबत्या विझवून केक कापत असेल तर असा केक खाणं शक्यतो टाळावं.

डॉक्टरांनी हे देखील सांगितले आहे की, जर आजारी व्यक्तीचा बर्थ डे साजरा केला आणि त्याने कँडल फुंकल्या तर तो केक खाणे बाकिच्यांनी टाळा. बर्थ डे केक वरील कँडल विझणे सामान्य वाटत असले तरीही ही गोष्ट गंभीर असल्याचं समजलं जातं.