येवले चहाला पिताय …. थांबा ही बातमी तुमच्यासाठी आहे

टीम महाराष्ट्र देशा : येवले चहासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी प्रयोग शाळेत करण्यात आली नाही. तसेच हे पदार्थविक्रीचा परवाना नसल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने येवले चहाचा तब्बल सहा लाखांचा माल जप्त केला आहे. कोंढव्यातील वेळेकरनगर याठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांची दिशाभूल प्रकरणी येवले चहाला नोटीसही बाजावण्यात आली आहे.

येवले चहामुळे आजार होतात, अशी माहिती एफडीए ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एफडीए च्या अधिकाऱ्यांनी येवले चहाच्या गोदामावर कारवाई केली. या कारवाईत चहाच्या प्रीमिक्स उत्पादनांच्या तपासणीत लेबल नसलेली आणि पदार्थांचे प्रमाण नसलेली पॅक बंद चहा मसाला आणि साखर आढळून आली. याशिवाय हे पदार्थ विक्री करण्याचा परवानाही नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

त्यावरून एफडीए ने सहा लाख रुपयांचा माल जप्त केला. येवले चहा पिल्याने पित्त होत नाही, चहासाठी फक्त मिनरल वॉटर वापरले जाते असा दावा येवले चहाने केला होता. मात्र या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे एफडीएचे सहायक आयुक्त सु. स देशमुख यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या