“शिवाजी पार्कातील कालचा भोंगा…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना जोरदार टोला

मुंबई : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. तसेच शिवाजी पार्कात काल भाजपचाच भोंगा वाजत होता, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘भाजप शासित राज्यात किती भोंगे हटवले ते सांगा? काल शिवाजी पार्कमध्ये भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या, घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या. त्यामुळे लोकांना वाटलं कालची सभा भाजपची आहे.’ तसेच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एवढी विकासाची कामे केली. मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केलं. ते राज ठाकरेंना दिसले नाही का?, असा सवालही राऊतांनी केला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,आमचा दृष्टीकोण विकासाचा असून राज्यात संकटं येतात त्यावर मात करून पुढे जायचे आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची घुसखोरी सुरू आह. या सर्वांच्या विरोधात लढायचे आहे’, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या