राष्ट्रवादीची २४ जागांची मागणी कॉंग्रेसला अमान्य,आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

मुंबई : आम्हाला ४८ पैकी २४ जागा द्या, असा आग्रह शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाने धरला, मात्र काँग्रेस २४ जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे मुंबईतील बैठकीत निर्णय झाला नाही. ५ राज्यांच्या विधानसभांचे निकाल ११ डिसेंबरला आहेत. त्यानंतर वाटपावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Loading...

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची परिस्थिती जैसे थे ठेवण्यात आली आहे.40 जागांचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित 8 जागांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार होती. मात्र या आठ जागांचे वाटप आजच्या बैठकीत पूर्ण होऊ शकलेले नाही. आठ पैकी 4 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत तर उर्वरित 4 जागांची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये अदलाबदलीवरून अडली आहे.मित्रपक्षापैकी खा. राजू शेट्टी, समाजवादी पक्ष, सीपीएम आणि सीपीआय यांच्याशी १९ नोव्हेंबरनंतर बोलणी होईल. त्यांच्यासाठी कोणत्या व कोणी जागा सोडायच्या यावर निर्णय होईल.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...