काल अर्थसंकल्प सादर झाला आणि गाजरांचा ढीग पडला : भुजबळ

टीम महाराष्ट्र देशा- शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. निषेध म्हणून एका शेतकऱ्याने कांद्याचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर केले. तर पोलिसांनी त्या शेतकऱ्याच्या पाठी तगादा लावला. आता पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. काल अर्थसंकल्प सादर झाला आणि गाजरांचा मोठा ढीग पडला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दौंड तालुक्यातील यवत येथे केली.यवत येथे झालेल्या परिवर्तन सभेत ते बोलत होते.

मनुस्मृती जाळली तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, अटक करण्यात आली. पण राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या एकावरही कारवाई झाली नाही. हे सरकार जातीवादी आहे, असेही भुजबळ म्हणाले.

दरम्यान, याच सभेत बोलतना देशात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने विकासाच्या कल्पना मांडल्या, मात्र त्या प्रत्यक्षात आणल्या नाहीत. भाजपा सरकारने जनतेला प्राधान्य देण्याऐवजी चुकीच्या लोकांना प्राधान्य देण्यात धन्यता मानली आहे. पंतप्रधान मोदी यांना आश्वासनांचा विसर पडला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.