‘यस सर’ झाले हद्दपार;शाळेत आता म्हणावे लागणार ‘जय हिंद’

टीम महाराष्ट्र देशा: देशभक्तीचे संस्कार विद्यार्थ्यांवर घडावेत यासाठी गुजरात सरकारने नवे पाऊल उचलले आहे. गुजरात मध्ये शाळेत विद्यार्थ्यांना आता उपस्थिती दर्शवण्यासाठी ‘यस सर’ किंवा ‘प्रेजेंट सर’ च्या जागी ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ म्हणावे लागणार आहे.लहान वयातच देशभक्तीची भावना विद्द्यार्थ्यांमध्ये रुजावी ह्या हेतूनेच असे फर्मान गुजरात सरकारने काढले आहे.१ जानेवारी २०१९ म्हणजेच आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

गुजरात सरकारच्या शिक्षण विभागाने सोमवारी याबाबतचे परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.राज्यातील सर्वच अनुदानित-विनानुदानित खासगी शाळांमध्ये पहिलीपासून ते बारावीपर्यंत हा नियम लागू होणार आहे.२०१८ मध्ये झालेल्या शिक्षण विभागातील कामासंदर्भात चर्चा करतेवेळी शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह चुडास्मा यांनी याबाबत निर्देश काढले.