होय,शरद पवार जाणते राजेच;सुशीलकुमार शिंदेंनी मिसळला आव्हाडांच्या सुरात-सूर

blank

टीम महाराष्ट्र देशा: जाणते राजे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंना चांगलेच फैलावर घेतले होते.आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही होय,शरद पवार जाणते राजेच आहेत असं म्हणत आव्हाडांची पाठराखण केली आहे.

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला चढवला होता.जाणता राजा हा फक्त शिवाजी महाराजच होते. अन्य कुणीही नाही.याच वादात आता सुशीलकुमार शिंदे यांनीही उडी घेतली आहे.

जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून सध्या गदारोळ चालू आहे. दुसरीकडे उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर देखील जोरदार घणाघात केला आहे. आज कोणालाही जाणता राजा उपाधी दिली जाते, कोणाला दिली गेली मला माहित माहित नाही. पण जाणता राजा फक्त एकच छ.शिवाजी महाराज. अस म्हणत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर कोणालाही जाणते राजे म्हणून घेण्याचा अधिकार नाही, आणि जे त्यांना जाणते राजे म्हणत असतील ते शिवाजी महाराजच अपमान करत असल्याचे देखील उदयनराजे म्हणाले.