होय शेक्सपियर ‘गे’ होता

William shekspear

वेबटीम: आपल्या तेजस्वी लेखणीने जगभरातील नाट्यरसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेल्या प्रख्यात नाटककार विलियम्स शेक्सपियर याच्याबद्दल एका ब्रिटिश दिगदर्शकाने जे विधान केले आहे त्यावरून मोठं वादळ निर्माण झालं आहे.या दिगदर्शकाने शेक्सपियर समलिंगी (गे) असल्याचा दावा केला आहे.

प्रख्यात नाटककार विलियम्स शेक्सपियर यांची लैंगिकता हा विषय गेली कित्येक दशके साहित्य जगात वादविवादाचा मुद्दा बनला आहे. त्यातच आता रॉयल शेक्सपियर कंपनीचे दिग्दर्शक ग्रेग डोरन यांनी शेक्सपियर समलिंगी (गे) असल्याचा दावा करीत त्यांची लैंगिकता लपवून ठेवणे स्वीकारार्ह नसल्याचे सांगितले आहे.

शेक्सपियर यांच्या नाटकांवर गेली कित्येक वर्षे काम करीत असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेता आले, असे ग्रेग डोरन यांनी बीबीसी रेडियो ४ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शेक्सपियरने १५४ सुनीतांचे काव्य लिहिले आहे. ते १६०९ साली प्रसिद्ध झाले. त्यापैकी १२६ चरणं ही पुरुषांना उद्देशून होती, महिलांना नाही, याकडे ग्रेग डोरेन यांनी लक्ष वेधले. दि मर्चंट ऑफ वेनिसमधील अँटोनियो सारख्या गे व्यक्तिरेखेकडे नाटककारांना दुर्लक्ष करता येणार नाही, असे ग्रेग म्हणाले.

# entertainment, William shekspear,greag doren, drama,hamlet,