होय… संघी चंद्रकांतदादांना हवं तसचं घडलंय, संतापलेल्या मराठा तरुणाचा हल्लाबोल

chandrkant patil

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पीठाने विचारार्थ मोठ्या पीठाकडे पाठवले आहे. यावेळी पदव्युत्तर प्रवेशाबाबतच्या नियमांत बदल करता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणावर विचार करण्यासाठी मोठ्या खंडपीठाची निर्मिती केली जाईल, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटले आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले असून मराठा समाजातील असंतोष उफाळून येत आहे. त्यामुळे अशाच एका मराठा तरुणाने आपल्या मनातील खदखद फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बाहेर काढली आहे. त्यामुळे मराठे नीट वाचतील, अशी अपेक्षा आहे.

अतुल पाटील या मराठा तरुणांची फेसबुक पोस्ट 

होय.. संघी_चंद्रकांतदादांना हवे तसेच घडलेय…
थोडक्यातच लिहतोय. मराठे नीट वाचतील, ही अपेक्षा!

मराठ्यांना शिक्षणात नोकरीत आरक्षण नाकारलेय. सर्वोच्च न्यायालयाने आज (९ सप्टेंबर २०२०) मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. २०१४ ला सत्ता जाता-जाता आघाडी सरकारने मराठ्यांना १६ टक्के आरक्षण दिले. पुढे ते कोर्टात अडकले. त्यानंतर महायुती सरकारने शिक्षणात आणि नोकरीत १२-१३ टक्के आरक्षण दिले. ते मुंबई उच्च न्यायालयात टिकले. मात्र, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळाले. तोवर राज्यात महायुती जाऊन महाविकास आघाडी स्थापन झाली. दोन वर्षापासून सुनावणी सुरु होत्या. दरम्यान, आरक्षण टिकेल कि नाही. यात टिकेल, असाच सुर होता. मात्र, नेमकं दोन महिन्यांपुर्वी भाजपाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणाले कि, महाविकासआघाडी सरकारने मराठा आरक्षण टिकवण्यासाठी लक्ष घातले नाही तर, किमान पंचवीस वर्ष पुन्हा आरक्षण मिळणार नाही. पुन्हा आमचं सरकार राज्यात आलं तरी, आरक्षण देऊ शकणार नाही. या वक्तव्यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात कि, महायुतीने दिलेले आरक्षण तकलादू होते. तसेच दगाफटका झाला तरी, हात झटकून महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडता येईल. ही रणनीती… खरी गोम तर इथूनच सुरु होतेय.

वरील वक्तव्यानंतर, चंद्रकांत पाटील यांचे समर्थक हे मराठा आरक्षण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करावे, अशी मागणी करू लागले. मराठा आरक्षणासाठी हे शेवटचे आयुधं आहे, ते सध्याच वापरू नये. वापरल्यास जे सध्या आरक्षण मिळते आहे, तेही धोक्यात येईल, अशी भीती मराठा क्रांती मोर्चातील काही प्रामाणिक मंडळींनी केली. त्यालाही येनकेनप्रकारे विरोध झाला. तो मावळण्याचे कारण म्हणजे, मराठा आरक्षणासाठी तळमळीने न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनीही हे प्रकरण पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करावे, अशी मागणी केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या गटाला आणखीनच बळ मिळाले. जास्त न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण गेल्यानंतर वीस पंचवीस वर्ष न्यायालयीन लढा सुरू राहील. आणि तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळत राहील. तसेच तामिळनाडू आरक्षणाप्रमाणे आपल्यालाही लाभ मिळेल. असा कयास त्यांचा असावा.

काही दिवसापूर्वी जेव्हा मराठा आरक्षण सुनावणी पूर्ण झाली तेव्हा, चंद्रकांत पाटलांचे मराठा क्रांती मोर्चातील समर्थक केस जिंकल्याच्या अविर्भावात स्वतःचाच उदोउदो करून घेत होते. त्यांच्या पोस्ट आजही फेसबुकवर आहेत. याचदरम्यान, ‘आरक्षण मिळालं तर, आमच्यामुळे. आणि नाही मिळाल्यास राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे.’ अशी डबल ढोलकी वाजवण्यासही मागेपुढे बघत नव्हते.

शंकेला वाव असल्याने इथे आणखी एक गोष्ट जोडणे तितकेच महत्त्वाचे आहे. ती म्हणजे, अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामध्ये सुरु असलेलं राजकीय घमासान. यात कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपा आणि खुद्द कंगणाला मुंबई विरोधी वक्तव्यामुळे बॅकफूटवर यावे लागले. नंतर मात्र कधीकाळी मराठा क्रांती मूक मोर्चाला मूकामोर्चा म्हणून हिणवणारे राऊत यांना आव्हान देताना कंगनाने ‘मी मराठा आहे.’असे म्हणत मराठ्यांचा क्षणाचा स्वाभिमान जागा केला. आणि राऊतांविरोधात मराठ्यांची फलटण मागे उभी करुन घेतली. तसेच ‘नऊ सप्टेंबरला मी मुंबईत येते.’असे खुले आव्हानही दिले. यांचा वाद सुरु झाला, नेमकं त्याचवेळी मराठा आरक्षणाची सुनावणी पूर्ण झाली होती. तर, निकाल राखीव ठेवला होता. कंगणा महाराष्ट्रात यायला आणि मराठा आरक्षणाचा निकाल लागायला. हा काहीजण योगायोगही समजतील. पण भारतीय माध्यमांची मानसिकता ओळखलेल्या पक्षासाठी ही संधी साधणे एवढेही अवघड नाही.

खास बाब अशी कि, कंगणा आणि मराठा आरक्षण यावर बोलायला सगळ्यात पहिल्यांदा पत्रकारांना सामोरे गेले ते चंद्रकांत पाटीलच. यावेळी त्यांनी आपल्याच आधी बोललेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. महाविकास आघाडीला दुषणे दिली. यावेळी घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्यासाठी दिलीप पाटील, विनोद पाटील यांनी प्रयत्न केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

विनोद पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत आजच्या निकालानंतरची टेलिव्हिजनवरची प्रतिक्रिया एकदा अवश्य पहा. यात चंद्रकांत पाटलांना आतून उमाळे फुटलेत. त्यांच्या मनासारखं झालंय, असेच ते व्यक्त होतायत. तर, विनोद पाटील काहीसे नाराज दिसतायेत. यातच सारं आलं. कुणीतरी कुणालातरी फसवतय. हे तुमच्याही लक्षात येईलच. तेलही गेलं अनं तुपही गेलं अशीच अनेकांची भावना आहे. यापुढे काही बाबी टाळल्या तर, घटनापीठाकडूनही लवकर आरक्षण पदरात पाडू शकतो. चंद्रकांत पाटील यांची भीती राजकीय स्वार्थासाठी वाटते. समाजासाठी खऱ्या अर्थाने झटणाऱ्यांनी पेटून उठत दलालांना बाजूला सारत नव्याने लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

– अतुल पाटील

महत्वाच्या बातम्या:-