“हो, मी ‘त्या’ महिलेसोबत संबधात होतो, पण तक्रार खोटी”, धनजंय मुंडेचे स्पष्टीकरण

“हो, मी ‘त्या’ महिलेसोबत संबधात होतो, पण तक्रार खोटी”, धनजंय मुंडेचे स्पष्टीकरण

dhananjay munde 1

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनजंय मुंडे यांच्याविरोधात एका युवतीने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. यावरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच मंत्री धनजंय मुंडे यांनी सोशल माध्यमांवर तक्रारीबाबत स्पष्टीकरण केले आहे. तक्रार केलेल्या युवतीच्या बहिणीसोबत आपण परस्पर सहमतीने संबंधांत होतो अशी माहिती त्यांनी दिली आहे. पण त्या युवतीने केलेली तक्रार ही खोटी असून या द्वारे मला ब्लॅकमेल केले जात असल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर विविध माध्यमांत आणि सोशल मीडियात धनजंय यांच्याविरोधात टीकेचे रान उठले आहे. तक्रारीच्या 24 तासानंतर मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. काय म्हणाले ते पाहा त्यांच्याच शब्दांत…

परस्पर सहमतीने राहत असलेल्या महिलेसोबत धनजंय मुंडे यांचे वाद न्यायालयीन प्रविष्ट आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये महिलेचे सोयीने प्रकरण सेटल करावे यासाठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो. तसेच यातून खंडणी वसूल करण्यात येत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती धनजंय मुंडे यांनी सोशल मीडियातून केली आहे.

महत्वाच्या बातम्या