इंदोर : सध्या टीव्ही इंडस्ट्री मधून एका मागून एक वाईट बातमी येत आहे. ‘भाभी जी घर पर है’ मधील मलखान उर्फ दिपेश भान यांचे हृदयविकाराच्या झटक्यात निधन झाले होते. तर आज अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है मधील संजू म्हणजेच वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येच्या बातमीने तिची चाहते हदरले असून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वैशाली ठक्कर हिने टीव्हीवर बराच काळ आपले अधिराज्य गाजवले आहे.
वैशाली ठक्कर हिने गळफास लावून केली आत्महत्या
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या अनेक वर्षापासून टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर होती. वैशाली गेले अनेक वर्ष तिच्या मूळ गावी इंदोर मध्ये राहत होती. तिने तिच्या मूळ गावी इंदोर मध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्येची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळावर वैशालीची एक सुसाईड नोटही सापडली आहे.
का केली वैशाली ने आत्महत्या?
ये रिश्ता क्या कहलाता है या सिरीयल मधील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने तिच्या राहत्या घरी आज गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनेबद्दल माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना वैशालीच्या मृतदेह सोबतच एक सुसाईड नोट तिच्या घरात सापडली. त्या सुसाईड नोट मध्ये वैशालीने तिच्या आत्महत्येचे कारण सांगितले आहे. मी माझ्या लव्ह लाईफ मुळे आत्महत्या करीत आहे असे त्या सुसाईड नोट मध्ये लिहिलेले होते.
या मालिकांमध्ये केले होते वैशालीने काम
गेल्या अनेक वर्षापासून वैशाली ठक्कर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने टीव्ही इंडस्ट्रीवर बराच काळ आपले अधिराज्य गाजवले होते. ती अनेक लोकप्रिय सिरीयल मध्ये दिसली होती. यामध्ये ‘ससुराल सिमर का’ ,’ये रिश्ता क्या कहलाता है’ या सिरीयलचा समावेश होता. त्याचबरोबर वैशाली सुपर सिस्टर, विषय या अमृत, मनमुनी 2, ये है आशिकी यामध्येही दिसली होती.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | “… म्हणून उद्धव ठाकरेंना पाण्यात, खिडकीत, जेवताना शिंदे दिसतात”, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
- “आरं… नुसतं टीव्हीवर दिसून मोठं होत नाही, अजून बायकोला लुगडं कधी घ्यायच याचा विचार करतोय”
- T20 World Cup। टी-२० विश्वचषकात भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू सर्वात महत्वाचा ठरेल; सुरेश रैनाचा खुलासा
- Raj Thackeray | शिवतीर्थवर खलबतं! राज ठाकरे अन् आशिष शेलारांची भेट, राजकीय चर्चांणा उधाण
- Maruti’s Upcoming Car | लवकरच लाँच होणार मारुतीची ‘ही’ नवीन SUV