Karnataka Election; येडीयुरप्पा राज्यपालांच्या भेटीला, लवकर निर्णय घेण्याची केली विनंती

कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. स्वतःची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली आहे. या बाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती येडीयुरप्पा यांनी राज्यपालांना केली आहे मात्र राज्यपालांनी येडीयुरप्पा यांना अद्याप सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं नाही .

दरम्यान,कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. कालच भाजपने काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत.

राजा व्यंकटप्पा नायक, वेंकट राव हे जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता आहेत.कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीएस येडीयुरप्पा यांनी स्वतः माहिती दिली आहे. येडीयुरप्पा यांची आज सकाळी विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनाकडे येडीयुरप्पा यांनी प्रस्थान केलं असून कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत आहेत.

दरम्यान,कर्नाटकमधील राजकीय पेच सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यात भाजपाला अपयश आले असले तरी त्यांच्याकडून सत्ता स्थापण्याचा पुरेपर प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, एका काँग्रेस आमदाराने पाठिंब्याच्या बदल्यात भाजपाने आपल्याला मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अमरगौडा पाटील असे या काँग्रेस आमदाराचे नाव आहे.

संबधित बातम्या

Karnataka Election; कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता