आता १५० जागा जिंकूनच परत येऊ ; ५५ तासांच्या मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच भावनिक भाषण !

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले. राजीनामा देत असतान येडीयुरप्पा यांनी भावनिक भाषण करत कर्नाटकच्या जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला.

यावेळी भावनिक होत येडीयुरप्पा यांनी भाषण केले, ते म्हणाले की, निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेने आम्हाला कौल दिला, आजवर आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली.राज्यातील जनतेने आम्हाला पाठींबा दिला आहे, माझ्याकडे १०४ आमदार आहेत, जनतेने जेडीएस आणि कॉंग्रेसला नाकारलं आहे. आपण राज्यातील साडेसहा कोटी जनतेचे आभारी आहोत.

सिद्धरामय्या सरकारला आलेल्या अपयशामुळे जमतेने आम्हाला बहुमत दिल, सिद्धराम्या सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. आम्ही ४० च्या संख्याबळावरून १०४ च्यावर जागा जिंकल्या. जनतेकडून मिळालेले प्रेम पाठिंबा कधीही विसरू शकत नाही. मात्र, काँग्रेस आणि जेडीएस चुकीचे राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी येडीयुरप्पा केला. अखेरच्या स्वासापर्यंत आपण जनतेची सेवा करत राहणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले. येत्या काळात कधीही निवडणुका होत होवू शकत असल्याचे म्हणत येडीयुरप्पा यांनी सूचक इशारा दिला आहे.