fbpx

बंदा ये बिंदास है…कुमारस्वामींची झोप उडविणारे येडियुरप्पा आमदारांसोबत चक्क क्रिकेट खेळत आहेत

टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला कर्नाटकात रोज राजकीय भूकंपाचे धक्के बसत असताना कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची झोप उडविणारे येडियुरप्पा एकदम रिलॅक्स मूडमध्ये आहेत. पक्षाच्या आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवले आहे तिथे येडियुरप्पा आमदारांसोबत चक्क क्रिकेट खेळत असल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकात सत्तास्थापनेची रणनिती ठरवण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी मंगळवारी बराचसा वेळ येलहंकाजवळच्या रिसॉर्टमध्ये घालवला. येडियुरप्पा येथे पक्षाचे आमदार रेणुकाचार्या आणि एसआर विश्वनाथ यांच्यासोबत क्रिकेट खेळले. त्यांचे फलंदाजी करतानाचे फोटो कर्नाटक भाजपाच्या मीडिया सेलने जारी केले होते.