fbpx

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्याचा औषध फवारण्याचा प्रयत्न

Sadabhau-Khot

विदर्भामध्ये पिकावर औषध फवारणी करताना १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज याच कारणावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोर जाव लागल आहे. तर एका शेतकऱ्याने थेट खोत यांच्यावर औषध फवारण्याचा प्रयत्न केला. फवारणीचा प्रयत्न करणाऱ्या सिकंदर शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फवारणी करताना शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याने यवतमाळमध्ये १९ शेतकऱ्यांना मृत्यू झाला. तर विषबाधेमुळे अनेकांना अंधत्व आले आहे. ७५० हून अधिक जन रुग्णालयात उपचार घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुधवारी यवतमाळमध्ये आले होते. यादरम्यान त्यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला.

 

2 Comments

Click here to post a comment