संतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची हत्या करण्यात आली असून त्यांचा रुग्णालयात मृत्यू भासवण्यात आला असल्याचा आरोप बाळासाहेबांवर निलेश राणे यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातील मेळाव्यात नारायण राणे यांच्यावर खुनाचे आरोप केले होते. त्याला उत्तर देताना निलेश राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर निशाणा साधल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं महाडमध्ये दहन करण्यात आलं. महाड शिवसैनिकांनी पुतळ्याला जोडेही मारले. तसंच नारायण राणे, आणि निलेश राणेंविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या :