‘माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार’; दरेकरांच्या वक्तव्यावर सुळेंचा बोलण्यास नकार

sule

मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे.

काल शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. दरेकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलण्यास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नकार दिला आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रविण दरेकर यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर, मी याविषयी काहीही बोलणार नाही. माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

तर प्रवीण दरेकर यांच्या या विधानावर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चांगलाच घणाघात केला होता. यावेळी त्यांनी महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो असा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या