मुक्त विद्यापीठातील गैरकारभारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले असून विद्यापीठाच्या बी.एससी. अभ्यासक्रमाची पुस्तके तयार न करताच लाखो रुपयांचा अपहार केला. तयार करण्यात आलेल्या व्हीडीओ लेक्चर्समध्येही घोटाळा करण्यात आलेला आहे.

कोर्स तयार करण्यासाठी तत्कालीन संचालकाकडून माजी संचालकाच्या मुलीचीच नेमणूक करण्यात आली आहे. विद्यमान संचालकांच्या पतीनेही लेक्चर्स तयार केलेले आहे. त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी आ. जयवंतराव जाधव यांनी दिलेल्या पत्रात केली अाहे

You might also like
Comments
Loading...