नरेंद्र मोदींना निवडणुकीत मात देण्यासाठी यशवंत सिन्हा सज्ज

yashwant-sinha-MODI

मुंबई: आज मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची आज मुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपातल्या बंडखोरांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अराजकीय मंचाची स्थापना करण्याचा निर्णय झाल्याचे भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी स्पष्ट केले.

देशात विरोधकांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी बैठकीवर बैठकी सुरु आहेत. देशात तिसऱ्या आघाडीचे वारे वाहू लागले असतांना या विरोधकांच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस खासदार कुमार केतकर, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा,आणि आशिष देशमुख उपस्थित होते.

आशिष देशमुख म्हणाले, “बैठकीत अराजकीय मंचची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, देशात आणि राज्यातील तरुणा आणि शेतकऱ्यांमध्ये आज जी भावना आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली”