यशवंतराव गडाख यांना साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

अहमदनगर : महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी उपनगर शाखा व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा शांतीकुमार फिरोदिया स्मृती साहित्य गौरव पुरस्कार माजी खा.व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ.लिला गोविलकर,कवि टी.एन.परदेशी,कैलास दौंड व डॉ.सरला बार्नबस यांना साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे,अशी माहिती नगर येथे होणा-या विभागीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

Loading...

11 हजार रूपये रोख,स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ असे साहित्यगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.तसेच 5 हजार रूपये रोखस्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ असे साहित्यरत्न पुरस्काराचे स्वरूप आहे.येत्या रविवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

माजी खा.यशवंतराव गडाख यांनी 1997 साली नगरमध्ये 70 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अतिशय नेटके व यशस्वी आयोजन करून जिल्ह्यातील साहित्यिक व कला क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.तसेच सहवास,अंतर्वेध,माझे संचित आदि पुस्तकांचे लेखन करून आपल्या राजकीय क्षेत्रातील कार्याबरोबरच आपल्यालीतल साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडविले आहे.त्यांच्या या योगदानासाठीच त्यांना साहित्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे,असे नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितलेLoading…


Loading…

Loading...