यशराज फिल्म्सचे मदतीसाठी एक पाऊल पुढे; आदित्य चोप्रा यांचा मोठा निर्णय

आदित्य चोप्रा

मुंबई : यशराज फिल्म्सने आत्तापर्यंत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. अशा परिस्थितीत आता यशराज फिल्म्स लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. यशराज फिल्म्सला ५० वर्षे पूर्ण केली असून मोठा सोहळा करण्यात येणार होता . या आनंदात आदित्य चोप्रा यांनी हा सोहळा मोठ्या जोशात साजरा करण्याचा विचार केला होता आणि त्यासाठी मोठे बजेटही निश्चित करण्यात आला होता. मात्र आता या सोहळ्याचा सर्व पैसा कोरोनाबाधित लोकांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे करतील आदित्य चोप्रा यांनी सांगितले आहे.

यशराज स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या टीमने शूटिंग थांबले असले तरी, पुन्हा एकदा काम सुरू केले आहे. वायआरएफ स्टुडिओने यशराज फाऊंडेशनच्या वतीने गोरेगावमधील हजारो कामगारांना भोजन दिले आहे आणि हे काम वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. आपल्या या सोहळ्याच्या कोट्यवधींच्या बजेटमधून लोकांना अन्न पुरवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्यांना या खर्चातून जेवण पुरवले जात आहे.

यश राज फिल्म्सने गेल्या आठवड्यात ‘यश चोपड़ा साथी इनिशिएटिव्ह’ देखील सुरू केला, ज्याचे उद्दीष्ट मनोरंजन विश्वातील हजारो कामगारांना आर्थिक मदत देण्याचे आहे. या उपक्रमांतर्गत मनोरंजन विश्वातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५०००  रुपये देण्यात येणार आहेत. यासोबतच रेशनही लोकांना वाटप केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP