‘बिहारमध्ये कोरोना लस मोफत वाटणे म्हणजे भाजपचा चुनावी जुमला’

yashomati thakur

मुंबई- भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे.

भाजपकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचे प्रमुख आश्वासन असल्याचे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

दरम्यान, याच मुद्द्यावरून कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे. बिहारमध्ये कोरोना लस मोफत वाटणे म्हणजे भाजपचा चुनावी जुमला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. भाजप देशात भेदभाव करत असून इतर ठिकाणी जनावरे राहतात का? असा संतप्त सवालही यशोमती ठाकूर यांनी त्यांनी केला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोरोना लसीचं राजकारण करत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील यावरून भाजपचा चांगलाच समाचार घेतला होता. कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला होता. भारतीय जनता पार्टी निवडणूक हरली तरी या देशातल्या लोकांना लस मोफतच मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला ही लस पूर्ण मोफत दिली जाईल, असं स्पष्टच नवाब मलिक यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या