महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे; यशोमती ठाकूर यांचे महालक्ष्मीला साकडे

yashomati thakur

अमरावती- राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी गौरी आवाहन केले. यावेळी महालक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मीकडे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.

आदिमाया, आदिशक्ती, महालक्ष्मी राज्यातील प्रत्येक माणसाच्या घरात धनधान्य, सुखसौख्य, समृद्धी नांदू दे यंदा पाऊसकाळ चांगला झालाय अशीच तुझी कृपा राहू दे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लढण्याचं बळ दे. बळीराजाला जसं पावसाचं दान दिलं, तसंच राज्यातील कोविडची महामारी लवकरात लवकर दूर कर केंद्रातल्या अन्याय सरकारने वाढलेली महागाई आणि बेरोजगारी लवकरात लवकर कमी कर अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.

मुख्य म्हणजे या राज्यातील माय भगिनींच्या पोषणासाठी, सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी झुंजण्याचे बळ दे. महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे माय, माय भगिनींच्या रक्षणासाठी सरकारचे हात अधिक मजबूत कर ग माय. अशा शब्दात महालक्ष्मी मातेकडे राज्याच्या हितासाठी ठाकूर यांनी साकडे घालून प्रार्थना केली.

महत्वाच्या बातम्या :