अमरावतीमधील लॉकडॉऊन शिथिल करण्याची यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

yashomati

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय.

दरम्यान,अमरावती जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध वाढू लागला आहे.या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील लॉकडॉऊन शिथिल करण्याबाबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली असून पालकमंत्री यशोमती ठाकूर ह्या मुंबईला रवाना झाल्या असून उद्या मुख्यमंत्री यांना स्वतः भेटून ही मागणी करणार आहेत.

मध्यंतरी अमरावती शहरासह जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळल्याने टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून टाळेबंदी करण्याची आवश्यकता नाही, असे त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या